Bhulabai Che Gane Lyrics

Bhulabai Che Gane Lyrics. Bhulabai Che Gane Pahili Gun Pujabai Deva Deva Sadeva Ghatili Mandoba.

Bhulabai Che Gane Lyrics

पहिली गं पुजाबाई
देवा देवा सादेवा
घातीला मंडोबा
खेळी खेळी खंडोबा
खंडोबाच्या नारी बाई…

पहिली गं पुजाबाई
गवर बसली न्हायाला
शंकर आले पाह्यला
शंकर आमचे जावई
शालमुंदी करावी
करावीचे दोरे
भुलोजी आमचे गोरे
गोऱ्या पायी घागऱ्या
घागऱ्या आमच्या सोन्याच्या
पहिला आसू मोत्याचा
भुलोजी आमचा नात्याचा

==झामक-झुमक==
झामक-झुमक
बाजारा गेली
घरची गहुली
पाण्या नेली
पाणी काढता फुटला चुळा
सासूनं मारला टुचकन टोला
त्या बाई टोल्याची गाळली आसू…

==आडकीत जाऊ खिडकीत जाऊ==

आडकीत जाऊ खिडकीत जाऊ
खिडकीत होती सुई
भुलाबाईला लेक झाली
नाव ठेवा जुई…
==पाचा पुतराची माय==
“पाचा पुतराची माय, पालखीत बसून जाय’,
==भुलाबाई बाळंतीण==
“भुलाबाई बाळंतीण पहिला दिवस, पहिल्या दिवशी बाळाला टोपी’,
“भुलाबाई राणीचे डोहाळे’, “तिचे डोहाळे तिला भारी, नेऊन टाका पलंगावरी, शंकर बसले भुयारी’,

==”चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू’,==
== “पाचाचा पाळणा,==

बाळ नेता हनुमंता,
हनुमंताची निळी घोळी,
येता जाता कंबळतोडी’

==आपे दुध तापे त्यावर पिवळी साय==

==भिंती वरचा नागोबा==

Video

O Sheth Marathi Song Lyrics